sports

मोळ येथे वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस; शेतीपिकांचे नुकसान


मोळ (ता. खटाव) व  डिस्कळ, पसूचामळा या ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निढळ : मोळ (ता. खटाव) व  डिस्कळ, पसूचामळा या ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यंदाच्या रब्बी हंगामातील या परिसरातील हा तिसरा गारांचा पाऊस असून, गारपिटीमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. आजच्या गारपिटीने कांदा पिकाचे आणि कडब्याचे मोठे नुकसान झाले. 

 

काढायला आलेले आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. आंबे वादळी वार्‍यामुळे पडलेले आहेत. हवामान खात्याने दिलेले अंदाज खरे ठरत आहे. सतत गारपिटीने शेतकरी त्रस्त झाला आहे. या संकटाच्या काळात शासनाने शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.