sports

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूने ओलांडला पाचशेचा आकडा

आज दिवसभरात सर्वाधिक 25 बाधितांचा मृत्यू 

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, यामध्ये बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. सोमवारी (दि. 7) दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक 25 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूने पाचशेचा आकडा ओलांडला आहे.  

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, यामध्ये बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. सोमवारी (दि. 7) दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक 25 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूने पाचशेचा आकडा ओलांडला आहे.  

जिल्ह्यात सोमवारी (दि. 7) दिवसभरात मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांच्या तपशील : भरतगाव सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, कुडाळ, ता. जावली येथील 76 वर्षीय पुरुष, उंब्रज, ता. कराड येथील 60 वर्षीय महिला, वडूज, ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, इस्लामपूर येथील 80 वर्षीय पुरुष, ढोर गल्ली सातारा येथील 70 वर्षीय महिला, विद्यानगर कराड येथील 67 वर्षीय पुरुष, पुसेगाव, ता. खटाव येथील 43 वर्षीय पुरुष, वेण्णानगर सातारा येथील 55 वर्षीय महिला, वाठार किरोली, ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला.

कोंडवे, ता. सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, खावली, ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, भांडवली, ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, उचिताने, ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 57 वर्षीय महिला, सैदापूर कराड येथील 76 वर्षीय पुरुष, रेठरे, ता. कराड येथील 69 वर्षीय महिला, सोमवार पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, कोळकी, ता. फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील 58 वर्षीय महिला, एमआयडीसी सातारा येथील 90 वर्षीय महिला, आसरे, ता. वाई येथील 78 वर्षीय महिला, कासेगाव येथील 72 वर्षीय महिला, पांडे, ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, मंगळवार पेठ सातारा येथील 86 वर्षीय पुरुष अशा एकूण 25 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.