जिल्ह्यात दिवसभरात 732 कोरोनाबाधित
रविवारी 38 बाधितांचा मृत्यू : 384 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 30,824
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 38 कोरोनाबाधितांचा उपचादररम्यान मृत्यू झाला तर 732 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 30,824 इतकी झाली आहे तर आजपर्यंत 20,250 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 38 कोरोनाबाधितांचा उपचादररम्यान मृत्यू झाला तर 732 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 30,824 इतकी झाली आहे तर आजपर्यंत 20,250 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 384 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 384 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 269 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
269 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 15, खंडाळा 64, पानमळेवाडी 74, मायणी 66, महाबळेश्वर 50 अशा एकूण 269 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.


