cineworld

सोबत असणार्‍या व्यक्तींवरून ठरतो तुमचा आकर्षकपणा


णार्‍या व्यक्तींवरुन ठरतो, हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्यकारक वाटेल. पण हे खरं आहे. तुमच्या सोबत कोण आहे आणि सोबत असणार्‍या व्यक्ती तुमच्या तुलनेत किती सुंदर आहेत, यावरुन तुमचा आकर्षकपणा ठरतो, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.

णार्‍या व्यक्तींवरुन ठरतो, हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्यकारक वाटेल. पण हे खरं आहे. तुमच्या सोबत कोण आहे आणि सोबत असणार्‍या व्यक्ती तुमच्या तुलनेत किती सुंदर आहेत, यावरुन तुमचा आकर्षकपणा ठरतो, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.
एखाद्या व्यक्तीचा आकर्षकपणा निश्चित स्वरुपाचा असतो, असं म्हटलं जातं. मात्र, लंडन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांनी आकर्षकपणा निश्चित स्वरुपाचा असतो, हे खोटं ठरवलं आहे. याबाबतचा एक रिपोर्ट ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. 40 जणांच्या सर्वेक्षण करु, अभ्यासाअंती आकर्षकपणा सोबतच्या व्यक्तींवर अवलंबून असल्याची मांडणी करण्यात आली आहे. या अभ्यासादरम्यान सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना काही फोटो दाखवण्यात आले. त्यानंतर त्या फोटोंबाबत मत विचारण्यात आले. तेच फोटो अधिक संख्येत एकत्र करुन, त्यानंतर तुलना करण्यास सांगण्यात आले. यावेळी ज्या फोटोंना आकर्षक म्हणून पसंती मिळाली, ते फोटो इतर फोटोंच्या तुलनेत आकर्षक होते.
कुणाही व्यक्तीचा आकर्षकपणा हा त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीच्या दिसण्यावर अवलंबून असतं, असे डॉ. निकोलस फर्ल यांनी या अभ्यासाअंती सांगितले. याबाबत उदाहरणादाखल त्यांनी सांगितले की, तुम्ही एकट्या जॉर्ज क्लोनी यांचा फोटो पाहिल्यास, तुम्ही त्यांना सुंदर अशी उपमा द्याल. मात्र, तोच इतरांच्या फोटोंसोबत पाहिल्यास तुमच्या मतात फरक पडतो.
डॉ. फर्ल यांनी अभ्यासानंतर बोलताना सांगितले की, जाहिरात, वेबसाईट डिझाईनिंग आणि कन्झ्युमर बिहेवियर अशा क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.