‘राजेंद्र माने फाउंडेशन’ची दातृत्वाची भावना कौतुकास्पद
आ. मकरंद पाटील यांचे प्रतिपादन; फाउंडशनकडून महाबळेश्वर तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रात मास्कचे वाटप
‘कोरोना विषाणूपासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राजेंद्र माने फाउंडेशनतर्फे सर्वसामान्य नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यासाठी 1500 मास्क देऊन आपली दातृत्वाची भावना सिद्ध केली आहे. आगामी काळात त्यांनी येथील भूमिपुत्रांना स्पर्धा परीक्षांचं ज्ञान देण्यासाठी पुढे यावे,’ असे प्रतिपादन महाबळेश्वर-वाई-खंडाळा मतदार संघाचे आ. मकरंद पाटील यांनी केले.
पाचगणी : ‘कोरोना विषाणूपासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राजेंद्र माने फाउंडेशनतर्फे सर्वसामान्य नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यासाठी 1500 मास्क देऊन आपली दातृत्वाची भावना सिद्ध केली आहे. आगामी काळात त्यांनी येथील भूमिपुत्रांना स्पर्धा परीक्षांचं ज्ञान देण्यासाठी पुढे यावे,’ असे प्रतिपादन महाबळेश्वर-वाई-खंडाळा मतदार संघाचे आ. मकरंद पाटील यांनी केले.
पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील ‘माने फाउंडेशन’च्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी 1500 मास्क दिले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, नगरसेवक नारायण बिरामणे, मंगेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, ‘गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बांधकाम क्षेत्रात प्रख्यात असलेले माने कन्स्ट्रक्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या खबरदारीसाठी पुढे सरसावले आहे. समाजातील वंचित तथा गरजू घटकांना, गरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माने फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे.’
राजेंद्र राजपुरे म्हणाले, ‘सन 2010 मध्ये मुबंई येथे माने फाउंडेशनची स्थापना पाचगणीचे भूमिपुत्र राजेंद्र माने यांनी केली.आज या फाउंडेशनचे कार्य पाचगणी, महाबळेश्वर, रायगड आणि मुबंईत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सामाजिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक अशा चौफेर क्षेत्रात माने फाउंंडेशने आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले आहे.’
शेखर कासुर्डे म्हणाले, ‘या फाउंंडेशनचे सामाजिक कार्य मोठे असून, फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र माने यांचा समाजहिताचा उपक्रम प्रेरणादायी आहे.’
राजेंद्र माने यांनी स्वागत केले. मंगेश यादव यांनी आभार मानले.


