राज्य सरकारने नुकतेच आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर डीवायएसपी,एसीपी पदावरील राज्यभरातील अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. सरकारच्या याच आदेशाविरोधात कराडचे डीवायएसपी सुरज गुरव व दहिवडीचे डीवायएसपी बाबूराव महामुनी यांनी 'मॅट'मध्ये धाव घेतली आहे.
सातारा : राज्य सरकारने नुकतेच आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर डीवायएसपी,एसीपी पदावरील राज्यभरातील अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. सरकारच्या याच आदेशाविरोधात कराडचे डीवायएसपी सुरज गुरव व दहिवडीचे डीवायएसपी बाबूराव महामुनी यांनी 'मॅट'मध्ये धाव घेतली आहे.
सुरज गुरव व महामुनी हे विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सातारा जिल्ह्यात आले होते. चिपळूणवरून आलेल्या गुरव यांना कराडचा तर कोल्हापूरवरून आलेल्या महामुनी यांना दहिवडीचा पदभार मिळाला होता. त्यानंतर दोघांनी आपापल्या उपविभागात उठाव कामगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अचानक झालेल्या बदल्यांमुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.


