अन्यथा, लोणंद-शिरवळ रस्ता उखडून टाकू
शेतकरी कृती समितीचा इशारा : खंडाळा तहसील कार्यालयात चौपदरीकरणाबाबत बैठक
लोणंद-शिरवळ चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील शेतकर्याच्या रखडलेल्या प्रश्नाबाबत एक महिन्यात प्रस्ताव तयार करून मार्ग काढण्यात काढावा, निवाडयात समावेश नसलेल्या शेतकर्यांचे तडजोडीने भूसंपादन करण्याबाबत एकमत करण्यात आले आहे, मात्र यापूर्वी झालेल्या बैठकीतील मुद्दयांवर बांधकाम विभागाने कार्यवाही करण्यास विलंब केला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने एका महिन्यात लोणंद -शिरवळ चौपदरीकरण भुसंपादनाबाबत प्रस्ताव तयार करून मार्ग काढावा अन्यथा 2 ऑक्टोबरला रस्ता रोको आदोलन करुन लोणंद -शिरवळ रस्ता उखडुन टाकण्याचा इ
लोणंद : लोणंद-शिरवळ चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील शेतकर्याच्या रखडलेल्या प्रश्नाबाबत एक महिन्यात प्रस्ताव तयार करून मार्ग काढण्यात काढावा, निवाडयात समावेश नसलेल्या शेतकर्यांचे तडजोडीने भूसंपादन करण्याबाबत एकमत करण्यात आले आहे, मात्र यापूर्वी झालेल्या बैठकीतील मुद्दयांवर बांधकाम विभागाने कार्यवाही करण्यास विलंब केला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने एका महिन्यात लोणंद -शिरवळ चौपदरीकरण भुसंपादनाबाबत प्रस्ताव तयार करून मार्ग काढावा अन्यथा 2 ऑक्टोबरला रस्ता रोको आदोलन करुन लोणंद -शिरवळ रस्ता उखडुन टाकण्याचा इशारा शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
लोणंद-शिरवळ चौपदरीकरणाच्या भुसंपादनात निवाड्यात नसलेल्या जमिनीचा प्रश्न अद्यापही मिटला नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आमदार मकरंद पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारी यांची शेतकर्यांसमवेत एक बैठक खंडाळा तहसील कार्यालयात आयोजित होती या बैठकीत कृती समितीच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे.
या बैठकीला शेतकरी कृती समितीचे मार्गदर्शक शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव, बाळासाहेब साळुंखे, प्रांतधिकारी संगीता चौगुले, तहसिलदार दशरथ काळे, बांधकामचे उपअभियंता विश्वास ओहाळ, कृती समिती अध्यक्ष कुंडलिक दगडे यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी भुसंपादनातील त्रुटीबाबत वादळी चर्चा झाली. तसेच महिनाभरात संपादित जमिनीचे तडजोडीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. शेतकर्यांच्या संमतीशिवाय जमीनी घेण्याचे आदेश झाले आहेत, त्यातील बागायत व पोट खराब क्षेत्रात झालेल्या त्रुटी दूर करणे, संपादित जमिनीतील झाडे, विहिरी, ताली, फळझाडे, यांचे मूल्यांकन करून निवाड्यात समावेश करणे, ज्या इमारती, घरे, दुकाने रस्त्यात बाधित होत आहेत. अशा इमारतींचे संपूर्ण मूल्यांकन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
चौपदरीकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. हे सर्व प्रश्न प्रशासनाने एका महिन्यात मार्गी लावावे, अन्यथा 2 ऑक्टोबरला रस्ता रोको आदोलन करुन लोणंद -शिरवळ उखडून टाकण्याचा इशारा यावेळी शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
योग्य मोबदला दिल्यास संपादनास शेतकरी तयार
रस्त्यामध्ये जाणार्या जमिनीचा योग्य मोबदला दिल्यास शेतकरी संपादनाला संमती देण्यास तयार आहेत, ज्या लोकांचे क्षेत्र रस्त्यासाठी जाऊनही त्यांची निवाड्यात नोंद नाही त्यांचे तडजोडीचे प्रस्ताव पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने देऊन संपादन प्रक्रिया पूर्ण करावी असे बैठकीत ठरले आहे, मात्र याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास 2 ऑक्टोबरला पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
- पुरुषोत्तम जाधव, मार्गदर्शक, शेतकरी कृती समितीशेतकर्याची फरपट लवकर थांबवा
लोणंद -शिरवळ चारपदरीकरणामध्ये जमिनी जाणारे शेतकरी अनेक वर्षापासून न्यायालयीन लढा लढत आहेत, मात्र, त्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही, हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून प्रशासन व शेतकरी बैठकीचे आयोजन आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे. या बैठकीनुसार एका महिन्यात शेतकर्याचा प्रश्न मार्गी लावुन त्यांची फरफट थांबवा अन्यथा शेतकरी शांत बसणार नाहीत.
- बाळासाहेब साळुंखे, नेते, भादे जिल्हा परिषद गट


