जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल 496 बाधित आढळून आले तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल 496 बाधित आढळून आले तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या एकूण बाधितांची संख्या 10653 इतकी आहे.
आणखी 240 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 240 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये कराड तालुक्यातील 42, खंडाळा 11, खटाव 9, कोरेगाव 18, महाबळेश्वर 4, पाटण 6, सातारा 35, वाई 26 व इतर 89 अशा एकूण 240 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.800 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 8, कराड 81, फलटण 78, कोरेगाव 53, वाई 104, खंडाळा 99, रायगाव 54, पानमळेवाडी 82, मायणी 32, महाबळेश्वर 45, पाटण 28, दहिवडी 32 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 104 अशा एकूण 800 जणांचे नमुने तपासणीला पाठवले आहेत.


