sports

उरमोडीचे दरवाजे उघडले; वक्र दरवाजातून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग


उरमोडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, या भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची आवक वाढल्याने उरमोडीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. उरमोडीचे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, 13 रोजी सकाळी आठ वाजता उरमोडी वीज गृहातून 400 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. 

सोनवडी : उरमोडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, या भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची आवक वाढल्याने उरमोडीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. उरमोडीचे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, 13 रोजी सकाळी आठ वाजता उरमोडी वीज गृहातून 400 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. 
तर शुक्रवारी (दि. 14) साडेअकराच्या दरम्यान जलाशयाच्या वक्र दरवाजामधून 2600 क्युसेक  पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी कॅनॉलद्वारे माण-खटावला सोडण्यात येणार आहे. या परिसरातील लघुपाट बंधार्‍यांचे तलावही भरून वाहू लागले आहेत.