sports

परळी येथे नारळाच्या झाडावर वीज पडल्याने आगडोंब; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही


गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी ही सातत्याने पाहायला मिळते. कुठे सोसाट्याच्या वार्‍यासह तर कोठे गारांचा सडा असेच काहीसे चित्र दिसत आहे. 

सोनवडी : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी ही सातत्याने पाहायला मिळते. कुठे सोसाट्याच्या वार्‍यासह तर कोठे गारांचा सडा असेच काहीसे चित्र दिसत आहे. 

परळी खोर्‍यातही वळीव दाखल झाला. मात्र, मंगळवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 च्या दरम्यान परळी गावातील एका नारळाच्या झाडावर वीज पडल्याने ओल्या झाडावर आगडोंब झाला होता. सुमारे पंधरा मिनिटे झाडावर आग भडकत होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वीज पडल्याने पेटलेले नारळाचे झाड पाहण्यासाठी ग्रामस्थ येत होते.