sports

जिल्ह्यात दिवसभरात 790 कोरोनाबाधित

गुरुवारी 31 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू : 670 जण कोरोनामुक्त, एकूण रुग्णसंख्या 28,152

जिल्ह्यात गुरुवारी 790 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 31 जणांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 28,152 कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 17,777 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. 

सातारा : जिल्ह्यात गुरुवारी 790 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर 31 जणांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 28,152 कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 17,777 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. 


जिल्ह्यात आणखी 670 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 670 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 977 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

977 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय, कराड 35, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 53, कोरेगाव 83, वाई 124, खंडाळा 109, रायगाव 80, पानमळेवाडी 73, मायणी 56, महाबळेश्‍वर 65, पाटण 24, दहिवडी 31, खावली 100 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 128 अशा एकूण 977 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.