cineworld

वरीना हुसैन करणार तामिळ फिल्म इंडस्ट्रित पदार्पण


वरीना हुसैन सध्या ’द इन्कम्प्लिट मॅन’ च्या शुटिंगच्या निमित्ताने गोव्यात शुटिंग करते आहे. आता ती बॉलिवूड बरोबर दक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपले नशिब आजमावणार आहे, असे समजते आहे. दक्षिणेकडच्या ’एनटीआर’ प्रॉडक्शनबरोबर तिने एक बिग बजेट सिनेमा करण्यास होकार दिला आहे.

वरीना हुसैन सध्या ’द इन्कम्प्लिट मॅन’ च्या शुटिंगच्या निमित्ताने गोव्यात शुटिंग करते आहे. आता ती बॉलिवूड बरोबर दक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपले नशिब आजमावणार आहे, असे समजते आहे.
दक्षिणेकडच्या ’एनटीआर’ प्रॉडक्शनबरोबर तिने एक बिग बजेट सिनेमा करण्यास होकार दिला आहे. याच बिग बजेट सिनेमाच्या तयारीसाठी ती पुढच्या महिन्यात गोव्यातले शुटिंग संपवून हैदराबादला जाणार आहे. तिथे गेल्यानंतर कथेतील तिचा रोल नीट समजून घेणार आहे.
त्याशिवाय तिच्या रोलच्या दृष्टीनेही तिला बर्‍याच गोष्टी समजून घ्याव्या लागतील. वरीना हुसैनला दक्षिणेतल्या बिग बजेट सिनेमातल्या रोलची ऑफर मिळण्याचे कारणही तसेच आहे. तिने सलमान खानचे प्रॉडक्शन असलेल्या ’लव यात्री’द्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. त्यानंतर तिने प्रसिद्ध रॅप गायक बादशहाच्या म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले.
त्याशिवाय सलमानच्या ’दबंग 3’ मध्ये ‘मुन्ना बदनाम हुआ’ हे आयटम साँगदेखील तिने केले आणि ते देखील सुपरहिट झाले होते. तिच्या डान्स स्कीलनेच दक्षिणेतील प्रेक्षकांना भुरळ घातली आणि तिला हा बिग बजेट सिनेमा मिळाला. आता दक्षिणेतही आपली ओळख निर्माण करण्यास ती आतूर झाली आहे.