sports

संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी

श्रीनिवास वाळवेकर यांचे सुशिलादेवी साळुंखे यांच्या जयंतीप्रसंगी प्रतिपादन

‘अत्यंत शांत, संयमी, प्रसन्न व सुस्वभावी असलेल्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. शिक्षण महर्षी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे यांनी उभी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. त्यांच्या पत्नी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याला व संस्था उभारणीला आयुष्यभर साथसोबत केली. संस्थेतील शिक्षण घेणार्‍या मुलांची,

 सातारा : ‘अत्यंत शांत, संयमी, प्रसन्न व सुस्वभावी असलेल्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. शिक्षण महर्षी प. पू. डॉ. बापूजी साळुंखे यांनी उभी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारी संस्था आहे. त्यांच्या पत्नी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक कार्याला व संस्था उभारणीला आयुष्यभर साथसोबत केली. संस्थेतील शिक्षण घेणार्‍या मुलांची, दीनदुबळ्यांची सावली म्हणून काम करून एखाद्या देव्हार्‍यात जळणार्‍या पणतीप्रमाणे त्यांनी बापूजींच्या बरोबर शैक्षणिक कार्याला वाहून घेऊन संस्थेची शैक्षणिक जडणघडण केली. यामुळेच संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे विचार, कार्य आणि त्याग आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरच्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त कोरेगाव-भीमा, ता. शिरूर, जि. पुणे येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्राचार्य वाळवेकर म्हणाले, ‘प्रत्येकाच्या जीवनात जन्म देणारी आई ही त्यागमूर्ती असते. आईने केलेले कार्य व दिलेले संस्कार खूप मोठे असतात. आईची थोरवी व कार्य सर्वांनाच मोठे करणारे असते. आई ही अन्नपूर्णा असते. आई सरस्वतीचे रूप असते. आईमध्ये आईपण असते, असे म्हणताना मन नतमस्तक होते. आईचे महात्म्य जाणणारा व स्त्रियांना बरोबरीचा दर्जा देणारा समाज पुढे जात असतो. त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे या आमच्या आईसमान असून त्यांच्या विचारातून, कार्यातून आणि त्यागातून प्रेरणा घेऊन आम्ही सर्व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कर्मचारी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे कार्य, विचार आणि त्याग या गोष्टीतून आम्हाला आमच्या दैनंदिन अध्यापनाच्या कामांमध्ये नेहमीच प्रेरणा मिळत असते.’

याप्रसंगी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांच्या हस्ते आणि हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

प्रा. साकोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. बेल्हेकर यांनी आभार मानले.