जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 342 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 342 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
यामध्ये जावली तालुक्यातील 13, कराड 144, खंडाळा 25, खटाव 5, कोरेगाव 26, महाबळेश्वर 15, माण 4, पाटण 17, फलटण 16, सातारा 60, वाई 17 अशा एकूण 342 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.
444 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 12, कोरेगाव 30, खंडाळा 90, मायणी 22, महाबळेश्वर 7, पानमळेवाडी 60, खावली 160 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 63 अशा एकूण 444 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.


