‘हायवे मृत्युंजय दूत’ अभियानाचा भुईंज महामार्ग पोलीस केंद्रातर्फे शुभारंभ
सपोनि दत्तात्रय गुरव यांची माहिती
महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज मार्फत महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते महामार्ग पोलीस विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हायवे मृत्युंजय दूत अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज यांच्या मार्फत जोशीविहीर (ता. वाई) येथील साईविश्व मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
सातारा : महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज मार्फत महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस निरीक्षक राजन सस्ते महामार्ग पोलीस विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हायवे मृत्युंजय दूत अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज यांच्या मार्फत जोशीविहीर (ता. वाई) येथील साईविश्व मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी आपण मनात कोणतीही भीती न बाळगता मदत केल्यास आपघातग्रस्ताचा जीव वाचणार आहे. असे आवाहन सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नितीन ताम्हाणे यांनी आपल्या भाषणात केले.
यावेळी कार्यक्रमात डॉ. विकास पाटील यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्याचा वापर करून अपघातग्रस्तांना वेळेत मदत करा, असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनि दत्तात्रय गुरव यांनी करत हायवे मृत्युंजय दूत अभियानाबद्दल माहिती देत अपघातग्रस्ताला एक तासाच्या आत वैद्यकीय मदत कशी मिळवून देता आली पाहिजे, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नितीन ताम्हाणे, प्रा. आर. एस. पाटील, डॉ. मनोहर ससाणे, डॉ. विकास पाटील, शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, महाबळेश्वर रेस्क्यू टीम, सह्याद्री अॅडव्हॅचर रेस्क्यू टीम, खंडाळा रेस्क्यू टीमचे सदस्य, तसेच महामार्ग पोलीस केंद्र, हद्दीतील राष्ट्रीय, राज्य महामार्गालगत असलेल्या गावातील नव्याने तयार करण्यात आलेल्या मृत्युंजय देवदूत या ग्रुप मधील सदस्य, कर्मचारी तसेच महामार्ग पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांनी सूत्रसंचालन केले.


