जिल्ह्यात दिवसभरात 441 कोरोनाबाधित
बुधवारी 27 बाधितांचा मृत्यू : 511 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 40,636
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 441 बाधितांची नोंद झाली असून, 27 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 511 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 441 बाधितांची नोंद झाली असून, 27 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 511 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 511 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 511 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
725 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 80, कराड 18, फलटण 34, कोरेगाव 31, वाई 57, खंडाळा 47, रायगाव 59, पानमळेवाडी 164, मायणी 11, महाबळेश्वर 22, दहिवडी 18, खावली 21, तळमावले 47, म्हसवड 39, पिंपोडा 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 67 अशा एकूण 725 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


