sports

धोकादायक व वाकलेल्या विद्युत पोलची दुरुस्ती करावी; शेतकर्‍यांची मागणी


वडगाव ज. स्वा ते रहाटणी रस्त्यालगत असलेले गुरवकीचे माळ या नावाने परिचित असलेल्या शिवारात दोन विद्युत पोल वाकलेले असून, ते पोल केव्हाही ढासळून अनर्थ होण्याची शक्यता दिसून येत आहे. तत्पूर्वीच विद्युत महामंडळाने त्या पोलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्या शिवारातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

पुसेसावळी : वडगाव ज. स्वा ते रहाटणी रस्त्यालगत असलेले गुरवकीचे माळ या नावाने परिचित असलेल्या शिवारात दोन विद्युत पोल वाकलेले असून, ते पोल केव्हाही ढासळून अनर्थ होण्याची शक्यता दिसून येत आहे. तत्पूर्वीच विद्युत महामंडळाने त्या पोलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्या शिवारातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

गुरवकीचे माळ या शिवारात  शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत. या शिवारातील दोन पोल गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वाकलेले आहेत. विद्युत महामंडळाच्या कर्मचार्‍यांना याची माहिती देखील आहे. तरी या वाकलेल्या पोलांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

उन्हाळी वार्‍यामध्ये वाकलेले पोल पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज खंडित होऊन शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होऊ शकते. विद्युत कंपनीने याची दखल घेऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवारातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.