sports

महाराष्ट्रात संपूर्ण नाही मात्र विकेंड लॉकडाऊन, उद्यापासून कडक निर्बंध! काय सुरु, काय बंद?


     मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन लावला जाणार असून येत्या शनिवारी (१० एप्रिल) आणि रविवारी (११ एप्रिल) कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय करोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लादले जाणार असून त्याबाबतच्या गाइडलाइन्स आजच जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकलसेवा मात्र जशी सुरू आहे तशी सुरू राहणार आहे. ( Weekend lockdown announced in Maharashtra ) राज्यात करोनाची स्थिती चिंताजनक होत चालल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाऊनबाबत गंभीरपणे विचार करण्यात आला व त्यानंतर एकमताने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यात ज्याप्रकारे निर्बंध लावण्यात आले आहेत. तोच फॉर्म्युला राज्यात वापरण्याबाबत विचार करण्यात आला. राज्यात येत्या विकेंडला कडक लॉकडाऊन असणार आहे. याबाबत मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर माहिती दिली काय सुरु, काय बंद  • शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन • लोकल ट्रेन सुरू राहणार • जिम बंद होणार • अत्यावश्यक सेवांना परवनगी  • रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार • अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी • रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील • धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील • सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद • गार्डन, मैदाने बंद • जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला • सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही • रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक  • बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल •  टॅक्सीत मास्क घालावा •  कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना •  मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी • चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी • बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल • शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील • प्रतिबंधित क्षेत्र तयार करा • सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार • 20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी  • लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित  • विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार