sports

विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या 50 जणांची कोरोना चाचणी 

एक महिला, दोन पुरुष आढळले कोरोनाबाधित 

सातार्‍यात विनाकारण बाहेर फिरणार्‍या  50 जणांची करोना तपासणी करण्यात आली. यामध्ये एक महिला व दोन पुरुष बाधित आढळून  आले.

सातारा : सातार्‍यात विनाकारण बाहेर फिरणार्‍या  50 जणांची करोना तपासणी करण्यात आली. यामध्ये एक महिला व दोन पुरुष बाधित आढळून  आले.

सातारा शहरात टाळेबंदी व संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करूनही नागरीक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. करोना तपासणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करूनही आज सकाळी पुन्हा रस्त्यावर गर्दी दिसत होती. त्यामुळे पोवई नाका परिसरात सकाळी  शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वाहतूक शाखेचे निरीक्षक विठ्ठल शेलार व त्यांच्या पथकाने विनाकारण फिरणार्‍यांना पकडून त्यांच्या करोना चाचण्या केल्या. आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कस्तूरबा रूग्णालयातर्गंत एकुण पन्नास  सातारकरांच्या आरएटी चाचण्या केल्या.

यामध्ये एक महिला व दोन पुरूष असे तीन जण करोना बाधीत असल्याचे समजून आले. त्याचा अहवाल त्यांच्याकडे देत पुढिल कार्यवाहीसाठी तसेच गृह विलगीकरण अथवा डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार पुढील उपचार करण्याच्या सुचना ही यावेळी देण्यात आल्या.उपचार करण्याच्या सुचना ही यावेळी देण्यात आल्या. सातारा शहरात पोवई नाका येथे एकाच ठिकाणी या तपासण्या करण्यात आल्या. मात्र यापुढे शहरातील सर्वच चौकांमध्ये तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वाहतूक शाखेचे निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी दिली.