sports

जिल्ह्यात दिवसभरात 39 कोरोनाबाधित

सोमवारी एका बाधिताचा मृत्यू : 64 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 39 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 64 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 39 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 64 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 64 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 64 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

323 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, कराड 41, फलटण 7, कोरेगाव 26, वाई 49, खंडाळा 4, रायगाव 18, पानमळेवाडी  57, महाबळेश्‍वर 25, म्हसवड 9 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 57 अशा एकूण 323 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.