चक्क ग्रामसेवकच विना मास्क; पोलिसांनी फाडली ५०० रुपयांची पावती
वडूज येथे प्रशासनाचे कडक निर्बंध
By वडूज प्रतिनिधी I आकाश यादव Thu 10th Sep 2020 08:52 am
सध्या वडूज शहरात आज पासून जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून ठीक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या वाहन धारकावर कारवाई केली जात आहे. त्यातच आज वडूज येथे चक्क दुचाकीवर फोन वर बोलत विना मास्क घालता एक ग्रामसेवक शहरात फिरत होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना थांबवून मास्क न वापरला याबाबत काही रुपयांचा दंडाची पावती केली . मात्र मी ग्रामसेवक आहे. माझ्याकडे पैसे नाहीत आता. अस म्हणत पावती न घेताच निघून गेले. दरम्यान काही वेळानंतर ते ग्रामसेवक महोदय संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यांकडे आले. आणि फाडलेल्या पावतीचे 500 रुपये दिले. त्यामुळे गाव पातळीवर कारवाई करणाऱ्या ग्रामसेवकाला आज चक्क विना मास्क फिरल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागले. विनोद भीमराव खाडे असे कारवाई करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. दरम्यान सर्वसामान्य लोकांवर कारवाई केली जाते त्याच प्रमाणे इतर लोकांवर पोलिस कारवाई करत असून कायदा , नियम हा सर्वांना सारखाच असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे तालुकाध्यक्ष युवराज पाटील यांनी दिली