sports

जिल्ह्यात दिवसभरात 690 कोरोनाबाधित

सोमवारी 40 बाधितांचा मृत्यू : 875 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 31,514

जिल्ह्यात सोमवारी तब्बल 40 जणांचे प्राण कोरोनाने घेतले. या महामारीचा उद्रेक वाढतच असून, दिवसभरात 690 जण बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 31,514 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे असून, त्यापैकी 21,125 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  

सातारा : जिल्ह्यात सोमवारी तब्बल 40 जणांचे प्राण कोरोनाने घेतले. या महामारीचा उद्रेक वाढतच असून, दिवसभरात 690 जण बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 31,514 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे असून, त्यापैकी 21,125 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  

जिल्ह्यात आणखी 875 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 875  जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 985 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 985 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 54, उपजिल्हा रुग्णालय, कराड 26, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 46, कोरेगाव 82, वाई 141, खंडाळा 82, रायगाव 98, पानमळेवाडी 40, मायणी 53, महाबळेश्‍वर 30, पाटण 27, दहिवडी 64, तळमावले 35 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 207 अशा एकूण 985 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.