जिल्ह्यात दिवसभरात 209 कोरोनाबाधित
सोमवारी 8 बाधितांचा मृत्यू : 726 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 43,865
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 209 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 726 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 209 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 726 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 726 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 726 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
453 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 41, कराड 18, फलटण 19, कोरेगाव 45, वाई 17, खंडाळा 18, रायगाव 45, पानमळेवाडी 38, महाबळेश्वर 10, पाटण 29, दहिवडी 25, तळमावले 30, म्हसवड 29 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 89 अशा एकूण 453 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


