पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची राजकीय हेतूने अचानक व अन्यायकारक तडकाफडकी झालेल्या बदलीचा निषेधार्थ उद्या सकाळी 11.30 वाजता कराडकर मोर्चा काढून प्रांत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध नोंदवणार आहेत
कराड ः पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांची राजकीय हेतूने अचानक व अन्यायकारक तडकाफडकी झालेल्या बदलीचा निषेधार्थ उद्या सकाळी 11.30 वाजता कराडकर मोर्चा काढून प्रांत व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध नोंदवणार आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी कराडमध्ये नव्याने पोलिस उपअधीक्षक पदासाठी नियुक्त होऊन सुरज गुरव यांनी कार्यभारासाठी सूत्रे हातात घेतली. कोल्हापूर येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेला वादामुळे सुरज गुरव चांगलेच चर्चेत होते. त्यांनी कराडमध्ये त्यांच्या सिंघमगिरीची प्रचिती कराडकरांना दाखवून दिली. अगदी सहजपणे कराडमधील गुंडगिरीवर नियंत्रण मिळवीत त्यांनी गावगुंडाच्या मनात पोलीस खात्याबद्दल चांगलीच दहशत निर्माण केली. कराडमध्ये कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करून नागरिकांचा या व्यवस्थेवरील विश्वास आणखी बळकट केला. हे सर्व सुरळीत चालू असताना कोरोना सारखे महाभयंकर असे संकट देशावर चालून आले याला कशा पद्धतीने सामोरे जावे याच्या सरकारनी पाठविलेल्या सर्व गाईड लाईन तंतोतंत पाळून करोना या आजारापासून कराडकरांना लांब ठेवण्यात यश मिळविले. नंतर जसे जसे करोनाचा प्रसार वाढू लागला त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक करोना बरोबर लॉक डाऊनच्या तडाख्याने होरपळू लागला आणि याच वेळेला हा सिंघम पुन्हा एकदा कराडकर नागरिकांसाठी धावून आला. या संकटाला सामोरे जाताना सुरज गुरव यांनी शहरातील दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, उद्योजक व पोलीस खाते या सर्वांची एकत्र मोट बांधून ‘कराडची माणुसकी’ या ग्रुपची स्थापना करून त्याद्वारे कराडमधील गरजू व गरीब कुटुंबाना तसेच परप्रांतीय मजुरांसाठी रोजच्या जीवनातील आवश्यक सामग्री व अन्नधान्य सर्व गरजू व्यक्तींपर्यंत ग्रुप द्वारे पोहोचविली गेली. या नंतर जशी जशी ऑक्सिजन बेड ची कमतरता कराडमध्ये भासू लागली तातडीने ऑक्सिजन ग्रुप ची स्थापना करून त्याद्वारे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्याचे खूप मोठे काम त्यांनी केले. त्यांच्या मुदतपूर्व झालेल्या या तडकाफडकी बदलीचा कराडमध्ये सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असून कर्तबगार व कर्तव्यदक्ष अधिकार्याची बदली त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी कराडकर नागरीक दि. 03 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता छ. शिवाजी महाराजांना वंदन करून सदर निवेदन प्रांत साहेब व वरीष्ठ पोलिस निरीक्षक कराड शहर यांना देवून शासनाचा निषेध करणार आहेत.


