cineworld

सलमानचा ‘टायगर 3’ इथे होणार शूट


सलमान खानचे ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद दिला. याच मालिकेतला तिसरा भागही येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

सलमान खानचे ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना भरघोस प्रतिसाद दिला. याच मालिकेतला तिसरा भागही येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. आता या तिसर्‍या भागाच्या चित्रीकरणाबद्दल एक बातमी समोर आली आहे.
बॉलीवूड हंगामाने दिलेल्या बातमीनुसार, यशराज फिल्म्सने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या लोकेशनबद्दल माहिती दिली आहे. तसंच हा चित्रपट या मालिकेतल्या इतर दोन चित्रपटांपेक्षा भव्यदिव्य आणि बिग बजेट असणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण तीन देशांमध्ये होणार असल्याची बातमी समोर येत आहे.
हा चित्रपट इतर दोन चित्रपटांपेक्षा मोठा आणि बिग बजेट असल्यानं त्यात आधीच्या दोन चित्रपटांपेक्षा जास्त ऍक्शन, ड्रामा आणि अनोखी, खास लोकेशन्स असणार असल्याची माहिती यशराज फिल्मने दिली आहे. सध्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण परदेशात होतं. याही चित्रपटाचं चित्रीकरण परदेशात होणार आहे. यशराज फिल्म्सने या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तीन देशांमधले लोकेशन्स निश्‍चित केले आहेत. सौदी अरेबिया, इस्तंबूल आणि युरोप या देशांमध्ये हे शूटिंग होणार आहे.
इस्तंबूल ही प्रथम निवड असल्याचं समजत आहे. कारण, याच देशाने चित्रीकरणासाठी लागणाऱे परवाने आणि इतर तांत्रिक गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. चित्रीकरणाच्या पहिल्या शेड्युलसाठी तरी इस्तंबूलमधील सुंदर लोकेशन वापरणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे.
या तिसर्‍या भागात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत तर या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत. हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.