sports

खर्चाला फाटा देत नवदाम्पत्याने चवणेश्‍वर ग्रामस्थांना केली जीवनावश्यक वस्तूंची मदत

पिंपोडे जिमखानासह इतर सामाजिक संस्थांचाही मदतीचा हातभार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विवाह झालेल्या नवदाम्पत्यांनी खर्चाला फाटा देत, सामाजिक व विधायक विचारातून कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असणार्‍या व कोरोनाशी सामना करणार्‍या चवणेश्‍वर गावातील हातावर पोट असणार्‍या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.    

रणजित लेंभे 

पिंपोडे बुद्रुक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विवाह झालेल्या नवदाम्पत्यांनी खर्चाला फाटा देत, सामाजिक व विधायक विचारातून कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असणार्‍या व कोरोनाशी सामना करणार्‍या चवणेश्‍वर गावातील हातावर पोट असणार्‍या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे.         
कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असणारे साडेतीनशे लोकांचे गाव. डोंगराच्या खाली असणार्‍या गावातील लोकांच्या शेतात जाऊन रोजंदारीने काम करणे आणि जोडधंदा म्हणून घरी एक-दोन गायी सांभाळून गुजराण करणे, हा येथील लोकांचा मुख्य चरितार्थ आहे. अनेक समस्यांची असणारी वाणवा, मात्र कोरोनाच्या महासंकटात आर्थिक समस्येबरोबर दैनंदिन जीवन जगणेही अनेकांचे मुश्कील झाले आहे. यामध्ये अनेक क्षेत्रासह शेतीला सुद्धा मोठा फटका बसला आहे. कायम दुसर्‍याच्या शेतात जाऊन दोन वेळची चूल पेटवणार्‍या लोकांना या लॉकडाऊन व कोरोना संकटाने हाताश केले आहे. अनेक सर्वसामान्य कुटुंबांना हाताला काम मिळत नसल्याने दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होऊ लागली आहे. 
माणुसकीची साद घालत परिसरातील लोकांनी मदतीच्या आवाहनाच्या आशयाची पोस्ट सामाजिक कार्यकर्ते सुमित भोईटे यांची फेसबुक व सोशल मीडियावर फिरत होती. या आवाहनाला प्रतिसाद देत विधायक हेतूने पिंपोडे बुद्रुक येथील व पुणे येथे नोकरीला असणारे अमित सुभाष लेंभे आणि अल्पना लेंभे यांचा या लॉकडाऊनमध्ये विवाह मे महिन्यात झाला आहे. खर्चाला फाटा देत विधायक कार्याला मदत करण्याचा या नवदाम्पत्याचा मानस होता. आणि योगायोगाने ही सोशल मीडियावरील पोस्ट पाहिली आणि या नवदाम्पत्य आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत असणार्‍या जिमखाना आणि हँडबॉल असोसिएशन, सातारा जिल्हा राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ, जनकल्याण समिती यांनी सुमित भोईटे यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत चवणेश्‍वर डोंगरावर असणार्‍या गावात जाऊन तीस कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे किटचे नुकतेच वाटप करण्यात आले. 
यावेळी जिमखाना असोसिएशनचे संस्थापक दत्तात्रय पवार, अध्यक्ष संदीप कदम, सचिव सचिन लेंभे, सुमित भोईटे, सरपंच दयानंद शेरे, माजी उपसरपंच युवराज शेरे, संतोष पवार, पै. दिगंबर निकम, रणजित लेंभे, अमोल कांबळे, विक्रम निकम, हरेश चव्हाण, प्रवीण कांबळे, अमित वाघांबरे, अक्षय कर्पे, अभिषेक नाचण, हरी शेरे व ग्रामस्थ उपस्थित होते.