जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तसेच बळींची संख्याही वाढली असून 25 जणांचा बळी गेला आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 800 जण बाधित झाले आहेत. सध्या बळींची संख्या 582 इतकी झाली आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. तसेच बळींची संख्याही वाढली असून 25 जणांचा बळी गेला आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 800 जण बाधित झाले आहेत. सध्या बळींची संख्या 582 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात 893 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 893 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, 957 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
957 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय, कराड 24, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 56, कोरेगाव 111, वाई 121, खंडाळा 124, रायगाव 105, पानमळेवाडी 102, मायणी 53, महाबळेश्वर 35, पाटण 28, खावली 29 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 153 अशा एकूण 957 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.


