cineworld

भूमी पेडणेकरने काढली सुशांत सिंहची आठवण


दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर स्टारर ’सोनचिरिया’ या चित्रपटाच्या रिलीजला सोमवारी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 1 मार्च 2019 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भूमी पेडणेकरने सुशांत सिंहची आठवण काढली आहे.


दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर स्टारर ’सोनचिरिया’ या चित्रपटाच्या रिलीजला सोमवारी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 1 मार्च 2019 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भूमी पेडणेकरने सुशांत सिंहची आठवण काढली आहे. दिव्य मराठीसोबतच्या खास संभाषणादरम्यान भूमीने सुशांत आणि या चित्रपटाशी संबंधित बर्याच गोष्टी शेअर केल्या.
सुशांत खूप चांगला माणूस आणि मेहनती कलाकार होता
भूमी म्हणाली, या चित्रपटाच्या निमित्ताने मला सुशांत सिंहसारख्या सर्जनशील व्यक्तीला भेटण्याची आणि त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तो एक चांगला माणूस आणि मेहनती कलाकार होता. त्याच्याबरोबर नोट्सची देवाणघेवाण करण्याचा अनुभव माझ्यासाठी सर्वात चांगला होता. ’सोनचिरिया’ने मला माझ्या आवडत्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली. ’सोनचिरिया’ची भूमिका साकारणारी एक छोटी मुलगी खुशिया आणि सुशांतसोबत काम करणे हा असा एक अनुभव आहे, जो कायम माझ्या हृदयाजवळ राहिल. खुशिया कायमच माझ्या जीवनाचा एक भाग राहिल. भूमी पुढे म्हणाली, ’सोनचिरिया हा माझ्या चित्रपट कारकीर्दीतील नेहमीच एक खास चित्रपट असेल. कारण या चित्रपटाने मला खूप मौल्यवान धडे शिकवले आहेत. या चित्रपटाने मला स्वप्न बघायला आणि कलाकार म्हणून प्रत्येक चित्रपटात मोठी जोखिम उचलायला शिकवले.