sports
जिल्ह्यात दिवसभरात 277 कोरोनाबाधित
रविवारी 20 बाधितांचा मृत्यू : 598 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 39,445
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 277 बाधितांची नोंद झाली असून, 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 598 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 277 बाधितांची नोंद झाली असून, 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 598 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 598 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 598 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
99 जणांचे स्त्राव तपासणीला
जिल्ह्यातील फलटण येथील 54, पानमळेवाडी 21, महाबळेश्वर 15, पिंपोडा येथील 6 अशा एकूण 99 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


