sports

जिल्ह्यात दिवसभरात 54 जण कोरोनाबाधित

15 जणांचे नमुने तपासणीसाठी

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 54 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयातील 15 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 54 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयातील 15 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. यामध्ये स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 7, पिंपोडा येथील 8  असे एकूण  15 जणांचे नमुने आहेत. आतापर्यंत एकूण नमुने 281687 पाठवले असून त्यापैकी एकूण बाधित 54541 आले तर उपचारानंतर 51533 जणांना घरी सोडण्यात आले. 1795 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप 1213 जण उपचार घेत आहेत.