sports

जिल्ह्यात 15 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

सोमवारी दिवसभरात 661 बाधित : एकूण रुग्णसंख्या 14,658

सातारा जिल्हा आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनू लागला आहे. जिल्ह्यात सोमवारी 661 जण बाधित झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 14,658 झाली आहे. तर 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

सातारा : सातारा जिल्हा आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनू लागला आहे. जिल्ह्यात सोमवारी 661 जण बाधित झाले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 14,658 झाली आहे. तर 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात आणखी 384 जण कोरोनामुक्त  
यामध्ये जावली तालुक्यातील 7, कराड 67, खंडाळा 7, खटाव 11, कोरेगाव 27, महाबळेश्‍वर 4, माण 22, पाटण 6, फलटण 36, सातारा 135, वाई 62 अशा एकूण 384 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.

728 जणांचे स्त्राव तपासणीला 
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 41, कोरेगाव 65, वाई 46, खंडाळा 79, रायगाव 48, पानमळेवाडी 115, मायणी 43, महाबळेश्‍वर 53, पाटण 15, खावली 24, ढेबेवाडी 49 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 136 अशा एकूण 728 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.