sports

जिल्ह्यात दिवसभरात 803 कोरोनाबाधित

शनिवारी 28 बाधितांचा मृत्यू : 955 कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 35,412

जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच असून, शनिवारी 803 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 28 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज 955 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच असून, शनिवारी 803 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 28 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज 955 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 955 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 955 जण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांना घरी सोडण्यात आले असून, 782 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
782 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 32, कराड 23, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 101, कोरेगाव 63, वाई 110, खंडाळा 68, रायगाव 80, पानमळेवाडी 67, मायणी 16, महाबळेश्‍वर 27, पाटण 27, दहिवडी 28, खावली 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 128 अशा एकूण 782 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहे.