sports
जिल्ह्यात दिवसभरात 191 कोरोनाबाधित
रविवारी 7 बाधितांचा मृत्यू : 60 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 47,978
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 191 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 60 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 191 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 60 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 60 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 60 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
14 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येतील 9, महाबळेश्वर 2, पिंपोडे येथील 3 अशा एकूण 14 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


