sports

जिल्ह्यात दिवसभरात 176 कोरोनाबाधित

शुक्रवारी एका बाधिताचा मृत्यू : 136 कोरोनामुक्त

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 176 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 136 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 176 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 136 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 136 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 136 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

479 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 40, कराड 62, फलटण 35, कोरेगाव 26, वाई 53, खंडाळा 11, रायगाव 24, पानमळेवाडी 113, महाबळेश्‍वर 15, दहिवडी 22, म्हसवड 28 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 50 अशा एकूण 479 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.