जिल्ह्यात सर्वाधिक 392 कोरोनाबाधित
दिवसभरात 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू : एकूण रुग्णसंख्या 8275
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधितांची नोंद झाली असून तब्बल 392 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधितांची नोंद झाली असून तब्बल 392 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यत मंगळवारी 392 जण बाधित झाले आहेत तर 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात सरताळे ता. जावली येथील 56 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, नेले, ता. सातारा येथेील 75 वर्षीय महिला, फलटण येथील 60 वर्षीय महिला व राजेवाडी निगडी, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण सहा बाधितांचा मृत्यू झाला. तसेच कराड येथे खाजगी रुग्णालयात आंबेडकरनगर पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, वाई येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 80 वर्षीय पुरुष व सातारा येथील खाजगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 51 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, गिगेवाडी, ता. कोरेगांव येथील 64 वर्षीय पुरुष असे एकूण पाच कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


