sports

कोरोना काळातही व्यवसायात वाढ हे संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्‍वासाचे प्रतीक

रामभाऊ लेंभे यांचे प्रतिपादन : पिंपोडे बुद्रुक  येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेची वार्षिक सभा सहा महिने लांबणीवर पडली. सभासदांना सभेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही तरी ऑनलाइन सहभाग घेता यावा व सूचना मांडता याव्यात म्हणून संस्थेने वार्षिक सभा झूमवर आयोजित केली असून, त्यासाठी लिंक दिली आहे. संस्थेने ठेवी व कर्जवाटपात नेहमी तरलता ठेवली आहे. लॉकडाऊन  काळात महाराष्ट्रात अर्थकारण थांबल्याने अनेक पतसंस्था अडचणीत आल्या असताना आपल्या संस्थेत सर्वच बाबतीत व्यवसायात वाढ झाली आहे. हे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्‍

पिंपोडे बुद्रुक : ‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेची वार्षिक सभा सहा महिने लांबणीवर पडली. सभासदांना सभेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही तरी ऑनलाइन सहभाग घेता यावा व सूचना मांडता याव्यात म्हणून संस्थेने वार्षिक सभा झूमवर आयोजित केली असून, त्यासाठी लिंक दिली आहे. संस्थेने ठेवी व कर्जवाटपात नेहमी तरलता ठेवली आहे. लॉकडाऊन  काळात महाराष्ट्रात अर्थकारण थांबल्याने अनेक पतसंस्था अडचणीत आल्या असताना आपल्या संस्थेत सर्वच बाबतीत व्यवसायात वाढ झाली आहे. हे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्‍वासाचे प्रतीक आहे,’ असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले.

पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवनमध्ये शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी चेअरमन हणमंतराव पवार होते. व्यासपीठावर सर्व संचालकांची उपस्थिती होती. प्रारंभी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले. सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली.

संस्थेच्या पहिल्या सभेपासून गेली 31 वर्षे अहवालवाचन करण्याचे भाग्य मला मिळाले. याबाबत मी भाग्यवान समजतो व सभासदांचे आभार मानतो, असे सांगून संस्थापक रामभाऊ लेंभे म्हणाले, ‘31 मार्च 2019 अखेर छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे कर्जवाटप 302 कोटी 92 लाख होते व ठेवी 432 कोटी 36 लाख होत्या. 31 मार्च 2020 अखेर कर्ज 328 कोटी 73 लाख व ठेवी 464 कोटी 75 लाख झाल्या आहेत.कर्जवाटपात 25 कोटी 81 लाखांनी व ठेवीमध्ये 32 कोटी 38 लाखांनी वाढ झाली आहे. याप्रमाणे निधी, तरतुदी, गुंतवणूक, खेळते भांडवलातही वाढ झालेली आहे.’

चेअरमन हणमंतराव पवार म्हणाले, ‘अहवाल सालात वसुली कमी व एनपीएची तरतूद जादा करावी लागल्यामुळे लाभांश देता येत नाही. मात्र, पुढील वर्षी सभासदांना कमीतकमी पाच टक्के लाभांश देण्याचा प्रयत्न करू,’ असे अंदाजपत्रकीय  नियोजन करण्यात आले आहे. 

सभासदांचा विश्‍वास, संचालक, सेवक, अधिकारी यांनी एकजीनसीपणाने काम केल्याने संस्थेच्या माध्यमातून सामान्य माणसाला आर्थिक पाठबळ व सुशिक्षित बेरोजगारांना काम देण्याचे शक्य झाल्याचे संचालक सुरेश साळुंखे यांनी सांगितले. 

अशोकराव लेंभे यांनी शासनाचे धोरणानुसार संस्थेने निर्णय घेतले असून कोरोना काळात वसुलीवर परिणाम झाला. मात्र इतर संस्थांच्या मानाने आपण प्रगतिपथावर असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, सभासद, अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सभास्थळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर व तापमापक यंत्र नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

प्र. कार्यकारी संचालक भावेश ढमाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन बाबूराव काकडे यांनी आभार मानले.