sports

जिल्ह्यात दिवसभरात 64 कोरोनाबाधित

शनिवारी दोन बाधितांचा मृत्यू : 100 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 100 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 100 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 100 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 100 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

258 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 43, कराड 45, कोरेगाव 23, खंडाळा 7, रायगाव 7, पानमळेवाडी 3, महाबळेश्‍वर 16, दहिवडी 26, म्हसवड 13, पिंपोडे 7 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 68 अशा एकूण 258 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.