sports
जिल्ह्यात दिवसभरात 144 कोरोनाबाधित
मंगळवारी 1 बाधिताचा मृत्यू : 106 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 51,369
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 144 बाधितांची नोंद झाली असून, 1 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 106 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 144 बाधितांची नोंद झाली असून, 1 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 106 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 106 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 106 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
305 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 33, कराड 22, फलटण 17, कोरेगाव 14, वाई 18, खंडाळा 12, रायगाव 17, पानमळेवाडी 50, महाबळेश्वर 5, दहिवडी 12, खावली 44 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 61 अशा एकूण 305 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.