cineworld

नव्या चित्रपटातून परिणीतीचं चाहत्यांना सरप्राईझ

प्रत्येक कलाकार हा सतत आपल्या क्षमता विस्तारण्याचा प्रयत्न करत असतो. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी चित्रपटात अभिनयासोबत गाणंही म्हटलं आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रानेही आपल्या एका चित्रपटात गाणं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे.

परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं गाणं सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतंय. या चित्रपटातलं ‘मतलबी यारीयाँ’ हे गाणं परिणीतीने स्वतः म्हटलं आहे. तिनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे. मला अजूनही विश्‍वास बसत नाहीये की मला गाणं गायची संधी मिळाली, असं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलं आहे.
परिणीतीने हे गाणं आपल्या भूमिकेचा विचार पुरेपूर विचार करून गायलंय हे गाण्यातून स्पष्टपणे कळत आहे. पात्राची असहाय्यता परिणीतीने गाण्यातही उतरवली आहे.
या चित्रपटात परिणीती स्मरणशक्ती हरवलेल्या मुलीची भूमिका साकारत आहे. ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या रहस्यमय आणि रोमांचक कथा असलेला हा चित्रपट आज नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रासोबत अभिनेत्री आदिती राव हैदरीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.