sports

रात्री 8 नंतर बाहेर पडू नका अन्यथा कारवाई ला सामोरे जाल

सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख

वडूज शहरात रात्री ८ वाजल्यानंतर कोणी ही बाहेर पडू नका अन्यथा कारवाईला सामोरे जाल असा इशारा वडूज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी दिला आहे. सध्या जिल्हयात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आज पासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यत जमावबंदी व संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्या आदेशाचे सर्वांनी पालन करायचे आहे. असे आवाहन श्री देशमुख यांनी केले आहे.