sports

जिल्ह्यात दिवसभरात 36 कोरोनाबाधित

सोमवारी एका बाधिताचा मृत्यू : 177 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 36 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 177 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सातारा : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 36 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 177 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

जिल्ह्यात आणखी 177 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 177 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

508 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 30, कराड 52, फलटण 32, कोरेगाव 38, वाई 71, खंडाळा 8, रायगाव 21, पानमळेवाडी 159, महाबळेश्‍वर 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज, येथील 72 अशा एकूण 508 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.