sports

राज्यात 6 हजार 281 नवे कोरोना रूग्ण; 40 जणांचा मृत्यू


मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (State Corona Count increased) डोकं वर केलं आहे. राज्यात 6 हजार 281 नवे कोरोना रूग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या मुंबईत 897 बाधित रुग्ण सापडले आहेत. दिवसागणिक रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. नियमांचं पालन न केल्यास नाईट कर्फ्यूचा विचार केला जाईल असा इशारा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. भारतात कोरोनाचे 7 हजार 569 म्युटेशन्स अस्तित्त्वात असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी हे विश्लेषण केलं आहे. भारतातील कोरोना घातक नसल्याचाही दावा संशोधकांनी केला आहे. राज्यात कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राज्यात ६ हजार २८१ नवे कोरोना रूग्ण तर कोरोनामुळं ४० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे ४८ हजार ४३९ ऍक्टिव्ह रूग्ण आहेत.