आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिने कुठलं वादग्रस्त वक्तव्य वगैरे केलेलं नाहीये. तर आता ती चर्चेत आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिने कुठलं वादग्रस्त वक्तव्य वगैरे केलेलं नाहीये. तर आता ती चर्चेत आहे तिच्या आगामी चित्रपटामुळे.
कंगना रणौतच्या ‘थलायवी’ या चित्रपटाबद्दल बर्याच चर्चा सुरु आहेत. हा चित्रपट तामिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जयललिता यांच्या जयंतीनिमित्त आज जाहीर केली आहे. येत्या 23 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीमने मोशन पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
अभिनेत्री कंगना रणौतनेही हे मोशन पोस्टर आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केलं आहे. जया अम्मा यांना यांच्या जयंतीनिमित्तचित्रपटांचा चेहरामोहरा बदलण्यापासून राज्याचं भाग्य बदलण्यापर्यंत जया अम्मा यांनी लाखोंचं नशीब घडवलं आहे. अशा महान व्यक्तीच्या ‘थलायवी’ या कथेचे साक्षीदार व्हा 23 एप्रिलला अशा आशयाचं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
या पोस्टरमध्ये जयललिता यांचा अभिनेत्री ते कुशल राजकारणी हा प्रेरणादायी प्रवास सांगितला आहे. कंगना यात जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातला तिचा लूकही तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पूर्वी शेअर केले आहेत.
हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.एल.विजय यांनी केलं आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. सोशल मिडियावरही या चित्रपटाबद्दल कायम चर्चा होत होत्या.