sports

जयवंत शुगर्सचा 239 रुपयांचा तिसरा हप्ता

संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा; शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग

एफआरपी रक्कमेतील उर्वरित 239 रूपयांचा तिसरा हफ्ता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांकना अदा करण्याचा निर्णय जयवंत शुगर्सने घेतला. त्यानुसार ही ऊसबिलाची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. - संस्थापक डॉ. सुरेश भोसले
कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यास सन 2019-20 या हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी सभासदांना प्रतिटन 239 रूपयांचा तिसरा हप्ता देण्याचा निर्णय संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे. कारखान्याकडून ऊसबिलाची ही रक्कम थेट शेतकर्यांपच्या बँक खात्यावर वर्ग केली गेल्याने, कोरोना संकट काळात शेतकर्यांथना मोठा दिलासा मिळाला आहे. जयवंत शुगर्सने सन 2019-2020 च्या गळीत हंगामात 134 दिवसात एकूण 5 लाख 62 हजार 777 मेट्रीक टन ऊस गाळप केले असून, सरासरी साखर उतारा 13.05 टक्के राहिला आहे. तर 6 लाख 71 हजार 500 क्विंटल साखर निर्मिती कारखान्याने केली आहे. कोरोनाच्या प्रतिकूल काळातही शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन व्यवस्थापनाने कारखाना यशस्वीपणे चालविला आहे. जयवंत शुगर्सने यापूर्वी शेतकरी सभासदांना एफआरपी रक्कम 2939 रूपयांपैकी 2500 रूपयांचा पहिला हफ्ता अदा केला आहे. त्यानंतर दुसरा हफ्ता 200 रूपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. आता या एफआरपी रक्कमेतील उर्वरित 239 रूपयांचा तिसरा हफ्ता कोरोना संकटाच्या पार्श्व.भूमीवर शेतकर्यांकना अदा करण्याचा निर्णय जयवंत शुगर्सने घेतला. त्यानुसार ही ऊसबिलाची रक्कम शेतकर्यांीच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.