सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद
‘एलसीबी’ची कारवाई : सुमारे दीड लाखाच्या 13 सायकली जप्त
सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणार्या टोळीचा सातारा ‘एलसीबी’ने पर्दाफाश केला आहे. या टोळीत दोन विधिसंघर्ष बालक अहेत. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांच्या 13 सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा शहरामध्ये सायकल चोरी करणार्या टोळीचा सातारा ‘एलसीबी’ने पर्दाफाश केला आहे. या टोळीत दोन विधिसंघर्ष बालक अहेत. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांच्या 13 सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 1 ते 3.30च्या दरम्यान गणेश भगवान तळेकर (रा. विलासपूर) गोडोली यांच्या राहत्या घरासमोर लावलेली त्यांच्या र्ईेंप चरुे कंपनीची गिअरची 8 हजारांची सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली होती. शहरात सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार ‘एलसीबी’मध्ये सायकल चोरट्यांचा छडा लावण्यासाठी विशेष पथकाची स्थापना झाली होती. या पथकाने सायकल चोरीबाबत तपास सुरू केला असतानाच दि. 20 रोजी पाडळी (ता. सातारा) येथील एका इसमाने साथीदारांसह गोडोलीत चोरलेली सायकल व सातारा शहरातून आणखी काही सायकल चोरलेल्या असून, त्या गावातील लोकांना विकलेल्या आहेत, अशी खबर ‘एलसीबी’ला मिळाली.
याबाबत खात्री करून कारवाई करण्यासाठी एलसीबीच्या पथकाने पथकाने पाडळी (ता. जि. सातारा) येथे जाऊन संबंधित इसमास ताब्यात घेऊन तपास केला असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असून, तो व त्याचे इतर दोन साथीदार यांनी गेल्या वर्षामध्ये सातारा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून सायकल चोरल्या असल्याचे सांगून 1,40,500 (एक लाख चाळीस हजार पाचशे रुपये) किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या एकूण 13 चोरलेल्या सायकल काढून दिल्या आहेत.
सर्व सायकल गुन्ह्याच्या तपासाकामी जप्त करण्यात आल्या असून, सायकल काढून देणार विधी संघर्षग्रस्त बालक व त्याचा साथीदार आणखी एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना गुन्ह्याच्या तपासाकामी ताब्यात घेऊन मा.बाल न्याय मंडळ सातारा यांच्यासमक्ष हजर केले असता त्यांना जामिनावर मुक्त केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार तानाजी माने, पो.हवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो.ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, प्रमोद सावंत, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो.कॉ. विशाल पवार, धीरज महाडिक, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, संकेत निकम, चालक विजय सावंत यांनी केली.
दरम्यान, ज्यांच्या सायकल चोरीस गेल्या असतील त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


