cineworld

ऑस्करच्या यादीत आणखी एक भारतीय सिनेमा; सूर्याच्या ‘सोहराई पोटरू’ची निवड

तमिळ सिनेसृष्टीसोबतच भारतीय सिनेसृष्टीसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुप्रसिद्ध साउथ स्टार सूर्या शिवकुमार याचा ‘सोहराई पोटरु’ हा सिनेमा ऑस्करच्या यादीत सामील झालाय. सुधा कोंगारा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसचं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन यासह विविध कॅटेगरीत सिनेमानं ऑस्करच्या यादीत एन्ट्री केलीय.

सिनेमाच्या मेकर्सनी ट्विटरवरुन ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. 93व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्रता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात इतर भारतीय भाषांच्या श्रेणीत ‘सोहराई पोटरु’ सिनेमाचं नाव सामील झालंय. सर्व देशांमधून निवडल्या गेलेल्या 366 सिनेमांच्या यादीत ‘सोहराई पोटरु’ या सिनेमानं स्थान मिळवलं आहे. 15 मार्चला ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा होणार आहे.
सोशल मीडियावर सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा सुरुय. तर अभिनेता सूर्याचं कौतुक केलं जातंय. एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाचं कथानक आहे. 2020 च्या उन्हाळ्यात हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार होता. मात्र करोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे अखेर निर्मात्यांनी अ‍ॅमेझॉन प्राइमवर सिनेमा रिलीज केला.
या सिनेमातील अभिनेता सूर्या शिवकुमार याने अनेक तमिळ सिनेमांमध्ये काम केलंय. तमिळ सिनेसृष्टीतील ‘गजनी’ आणि ‘सिंघम’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांमधून त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकताच सूर्या करोनातून बरा झाला आहे. त्याने त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगली सुरुवात केलीय..