cineworld

रविनाला बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण


अभिनेत्री रवीना टंडनला बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने 1991 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर ’पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा तिच्या करिअरचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटात तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र एका मुलाखतीत रवीनाने खुलासा केला की, तेव्हा तिला अभिनेत्री व्हायचे नव्हते. पण कदाचित हे तिचे भाग्य होते.


अभिनेत्री रवीना टंडनला बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने 1991 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर ’पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा तिच्या करिअरचा पहिला चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटात तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र एका मुलाखतीत रवीनाने खुलासा केला की, तेव्हा तिला अभिनेत्री व्हायचे नव्हते. पण कदाचित हे तिचे भाग्य होते. रवीनाने एका मुलाखतीत सलमानबरोबरची पहिली भेट आणि आपल्या अभिनय कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळाबद्दल सांगितले होते. तिच्या म्हणण्यानुसार, तिने कॉलेजमध्ये असताना अ‍ॅड गुरू प्रल्हाद कक्कड यांच्यासमवेत काही मॉडेलिंग प्रोजेक्ट केले होते.
रवीनाने सांगितले, जेव्हा मी प्रल्हाद कक्कड यांच्यासोबत इंटर्नशिप करत होते, तेव्हा लोकांनी मला म्हटले की, मी कॅमेर्याच्या मागे काय करीत आहे. कॅमेरासमोर अभिनय का करत नाही? ती पुढे म्हणाली, मी प्रल्हाद यांची कंपनी जेनिसिसमध्ये एक फ्री स्टँडिंग मॉडेल होती. जेव्हा एखादी मॉडेल गैरहजर असायची तेव्हा प्रल्हाद मला मॉडेल म्हणून घ्यायचे.
’पत्थर फूल’ अनंत बालानी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटासाठी रवीनाला बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
’पत्थर फूल’ अनंत बालानी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटासाठी रवीनाला बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
सलमान खानसोबत तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना रवीना म्हणाली की, एक दिवस ती वांद्रेमध्ये शूटिंग करत होती. तेव्हा तिथे तिला तिचा मित्र बंटीचा फोन आला जो सलमानचाही मित्र होता. बंटीने रवीनाला विचारले की ती तिथेच जवळपास आहे का? जर असेल तर भेटायला ये.
जेव्हा ती बंटीला भेटायला बाहेर आली तेव्हा सलमानदेखील सोबत होता. सलमान त्यावेळी जी.पी. सिप्पी यांच्या ‘पत्थर के फूल’ या नव्या चित्रपटासाठी नवीन चेह-याच्या शोधात होता. रवीनाच्या मित्राने सलमानला एकदा तिला बघण्याचा सल्ला दिला होता. ती म्हणते, मी चित्रपटाला हो म्हणाले. हे ऐकून माझ्या मैत्रिणी खूप आनंदी झाला. हवं तर यापुढे चित्रपट करु नकोस, पण हा चित्रपट सोडू नको, असा सल्ला मैत्रिणींनी दिला होता, असे रवीनाने सांगितले. ’पत्थर के फूल’ पासून सलमान आणि रवीनाची मैत्री अजूनही अबाधित आहे. दोघांनी ’अंदाज अपना अपना’ (1994) आणि ’कहीं प्यार ना हो जाए’ (2000) सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. रवीना सलमानच्या होम प्रॉडक्शनच्या ’नच बलिये 9’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसली होती. एका एपिसोडमध्ये सलमान स्वत: सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आला होता.