जिल्ह्यात दिवसभरात 535 कोरोनाबाधित
गुरुवारी 20 बाधितांचा मृत्यू : 602 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 38,347
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 535 बाधितांची नोंद झाली असून, 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 602 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 535 बाधितांची नोंद झाली असून, 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 602 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात आणखी 602 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले 602 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
750 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 70, कराड 20, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 55, कोरेगाव 49, वाई 63, खंडाळा 81, रायगाव 57, पानमळेवाडी 138, मायणी 15, महाबळेश्वर 25, पाटण 15, दहिवडी 23, खावली 28, म्हसवड 20 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 91 अशा एकूण 750 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


