जिल्ह्यात 16 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
बुधवारी सर्वाधिक 713 बाधित ः एकूण बाधितांची संख्या 15960
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक 713 जण बाधित झाले. तसेच 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सातारकरांची धास्ती वाढली आहे.
जिल्ह्यात आणखी 373 कोरोनामुक्त
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 373 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
यामध्ये जावली तालुक्यातील 30, कराड 82, खंडाळा 27, खटाव 9, कोरेगाव 12, महाबळेश्वर 4, माण 17, पाटण 9, फलटण 4, सातारा 148 व वाई 31 अशा एकूण 373 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.
942 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 16, उपजिल्हा रुग्णालय, कराड 169, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 34, कोरेगाव 96, वाई 32, खंडाळा 99, रायगाव 68, पानमळेवाडी 54, मायणी 104, महाबळेश्वर 42, पाटण 11, दहिवडी 28, खावली 50 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 139 अशा एकूण 942 जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत.


