मेगन मार्कल आणि प्रिंस हॅरी हे ओप्रा विन्फ्रें यांच्याशी झालेल्या इंटरव्ह्यू नंतर फारच चर्चेत आले होते. शाही परिवारातील अनेक गोष्टी त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या होत्या. पेज सिक्सच्या वृत्तानुसार शाही परिवाराकडून रॉयल्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण यात प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांना खालचं स्थान देण्यात आलं आहे.
युके डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार , 9 शाही परिवार सदस्यानंतर प्रिंस हॅरी आणि मेगन यांना स्थान देण्यात आलं आहे. द ड्यूक अँड डचेस ऑफ कॅम्ब्रिज, प्रिंस विलियम आणि केट मिडलटन यांच्यानंतर मेगन आणि प्रिंस हॅरी यांच नाव आहे. प्रिंस हॅरीचे पिता प्रिंस चार्ल्स आणि कॅमिला, राजकुमारी अँनी, प्रिंस अँड्रयू आणि वॅसेक्स, प्रिंस एडवर्ड सोफी वॅसेक्स यांच्यानंतर हॅरी आणि मेगन आहेत.
प्रिंस हॅरी आणि मेगन यांनी शाही कर्तव्यांपासून दूर जाऊन दुसर्या शहरात राहण पसंत केलं होतं. ते लॉस एन्जेलीसमध्ये राहत आहेत. ओप्रा विन्फ्रें यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीत या शाही कपलने अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
मेगनने सांगितलं होत की, शाही परिवारात तिला सुरक्षित वाटत नाही तसेच तिच्या मुलाची सुरक्षाही धोक्यात आहे. मेगन आणि प्रिंस हॅरी हे आता शाही परिवाराचा भाग राहीले नाहीत. त्यांनी 2 वर्षांपूर्वी शाही कर्तव्यांवर पाणी सोडलं होतं. तर ते मुलगा आर्चीसह आता अमेरिकेत सामान्य नागरिकांप्रमाणे राहत आहेत. मेगन लवकरच पुन्हा एकदा आई देखील होणार आहे.